Sunday, March 26, 2017

नवा राक्षस ...




राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा

कवी गोविंदग्रजांनी वर्णन केलेल्या या महाराष्ट्राची परिस्थिती आज काय झालीय , खरंच त्याचं राकट पण शिल्लक आहे का या नाजूक आणि फुलांच्या महाराष्ट्रातील कोमलता खरंच उरली आहे का ? कि तो कणखर पणा आपल्याला शोधावा लागणार एखाद्या प्लास्टिक च्या ढिगाऱ्यात...
आजकाल काही तरी हटके करण्याचा ट्रेंड आलाय, त्याच वाटेवर टुरिझम मध्ये पण काही तरी हटके करण्याची ओढ आजच्या युवा पिढी ला लागलीय.म्हणूचं गड किल्ल्यांची सर, ट्रेकिंग, जंगल सफारी या गोष्टींकडे आजची हि पिढी आकर्षित होताना दिसते. परंतु हे आकर्षण पोकळ असते कारण काही तरी हटके करतांना त्या साठी सामान्य जगण्यातील अनेक गोष्टींचा त्याग करावा लागातो हे या लोकांना काळात नाहीय. यांना या गडकिल्ल्यांवर हवाय आपल्या आवडीचे शीत पेय, नुसती हवा भरलेली चिप्स ची पाकीट, आणि मूलभूत गरज वाटणारी मिनरल वॉटर ची बाटली. 
अनुभवलेलं एक जिवंत उदाहरण द्यावस वाटतं.. अगदी इतक्यातलं.. अहमदनगर जिल्ह्यातील सांधण व्हॅली .. मुंबई - पुणे - नाशिक या सुवर्ण त्रिकोणातील प्रसिद्ध ठिकाण, निसर्गाचं सह्याद्रीला दिलेलं एक अदभुत देणं... 
या व्हॅली ला पोहोचण्या साठी साम्रद गाव पासून साधारण 1 किलोमीटर पायपीट करावी लागते त्यानंतर दिसतं ते त्या दरी चं अप्रतिम दृश्य .. साधारण दीड वर्ष अगोदर माझी पहिल्यांदा या व्हॅली शी ओळख झाली.. त्या वेळ पासून आता पर्यंत अनेक बदल मी येथे पहिले.. येथे वाढणारी गर्दी पण पहिली .. ती माझ्या सोबतच जवळच्या गावकर्यांनी पण अनुभवली त्यांनी त्या संधीचे सोने फायदा केले आणि खाद्य विक्रीचे अनेक स्टोल्स वाढत वाढत आता व्हॅलीच्या तोंड पर्यंत पोहोचले.. त्या सोबतच येणाऱ्या पर्यटकताही बदल दिसला .. त्यांचे हात आता रिकामे नसतात .. हातात असतात विविध चिप्स ची पाकीट.. आणि ताहान भागावण्या साठी पाण्याच्या बाटल्या.. हे सर्व प्लास्टिक दरी मध्ये जाताना हातात असते खरं पण वापस येताना पर्यटक रिकाम्या हातांनी परततात.. मग या निसर्गाच्या चुरड्याला जवाबदार तरी कोण ?

कधी आपण विचार केलाय का , काही तरी हटके करण्या साठी आपल्या या निसर्गावर किती अन्याय करतो . प्लास्टिक च्या वापराने निसर्गातील होणाऱ्या दुष्परिणामांना कडे आपण दुर्लक्ष करतो . पण प्लास्टिक पोलुशन या महाभयानक विषात आपण आपल्या राष्ट्रीय स्मारके, आपले गड किल्ले , लेण्या , जंगले आणि अनेक निसर्ग सौंदर्य आरूढ जागांना ढवळत आहोत . प्लास्टिक मुळे आपल्या निसर्ग चक्रात होणार बदल अजूनही जाणवत नाही का आपल्याला? आता तरी जागे होऊया. आपल्या हातांना प्लास्टिक कुठेही न फेकण्याची सवय यवुया आणि निसर्ग सवारंक्षणात हातभार लावुया. आपल्याच महाराष्ट्रातील आणखीन एक पर्यटन स्थळ म्हणजे कोकणातील वेळास गाव .. इकोटुरिझम साठी प्रसिद्ध या गावात त्यांच्या ग्राम सभेने सामूहिक निर्णय घेऊन गावा बाहेरच्या व्यक्तीला गावात व्यवसायास बंदी घातलीय आणि समुद्र किनारी कुणीहि कुयहलाही व्यवसाय करणार नाही याची खबरदारी घेतलीय .. त्या मुळे येथे स्वछता तुमचे डोळे दिपून टाकतात ...
आणखी एक उदाहरण द्यायचे झाले तर अंदमान निकोबार बेटांवरील एक बेट म्हणजे जोली बोय बेट.. या बेटावर प्लास्टिक नेण्यास बंदी आहे.. मग पिण्याच्या बोटल्स ला पर्याय म्हणून तेथे जुन्या प्रकारच्या मिल्टन च्या वॉटर बॅग किरायाने दिले जातात....
उपाय अनेक आहेत पण आपल्याला सवय लागलीय ती आयते पणाची.. गरज आहे स्वजागृतीची.. 
मुंबईच्या चर्चगेट स्टेटशन वर नुकताच एक अनोखा उपक्रम राबाबीला जातोय .. एका आटोमॅटिक मशीन मध्ये प्लास्टिक कचरा आणून टाकल्यास त्यातून विविध प्रकारचे गिफ्ट कूपन प्राप्त होतायत. भारतीय लोभी मानसिकतेला ओळखून बनवलेली हि मशीन एक अप्रतिम कल्पना आहे .. प्लास्टिक हा जितका आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक होत चाललंय तितकाच तो हानी कारक आहे. 
माउंट एव्हरेस्ट सर करण्या पूर्वी तिथल्या सरकार ला काही अमानत रक्कम द्यावी लागते आणि खाली येतांना तुम्ही 2 किलो प्लास्टिक कचरा सोबत आणला नाही तर तुमची अमानत रक्कम जप्त होते .. अश्या प्रकारचे नियम आपल्या पर्यटन स्थळां वर केले तर किमान त्या पर्यटन ठिकाणांना लागणार मूलभूत निधी तर उभा होईलच सोबतच जरा स्वछता पण दिसू लागेल .
प्लास्टिक चा वापर टाळा ...निसर्ग वाचवा. नाही तर या पुढच्या पिढिला काही तरी हटके करण्याचा वेळ राहणार नाही .. त्यांचा वेळ जाईल फक्त नि फक्त प्लास्टिक मधून आपलं आयुष्य सावडण्यात..

कुणी एक थोर सांगून गेला
निसर्गासारखा नाही रे सोयरा 
गुरू सखा बंधू मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप 

मिटती क्षणात आपोआप